बिहारच्या शिक्षण विभागाने हरतालिका तीज आणि जितियाच्या सुट्ट्या काढून टाकल्या आहेत आणि ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अधाच्या सुट्ट्या वाढवल्या आहेत.हिंदू सणांच्या सुट्ट्यांची संख्या कमी केल्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी नितीश कुमार सरकारवर टीका केली.
२०२४ साठी जारी करण्यात आलेल्या सुट्टीच्या कॅलेंडरवरून बिहार शिक्षण विभाग चर्चेत आला.हिंदुस्तान टाइम्सच्या भगिनी प्रकाशनानुसार, सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसांची संख्या २० वरून ३० पर्यंत वाढली आहे.
हरतालिका व्रत आणि जितियाच्या सुट्ट्या काढून टाकण्यात आल्या आहेत, शिक्षण विभागाने ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अधा (बकरीद) च्या सुट्ट्या प्रत्येकी तीन दिवसांपर्यंत वाढवल्या आहेत, असे लाइव्ह हिंदुस्तानच्या अहवालात म्हटले आहे.
नितीश कुमार सरकारवर आरोप करत राय यांनी एएनआयला सांगितले की, “नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील बिहारचे सरकार बिहारमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. हिंदूंच्या सणांच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत आणि मुस्लिमांच्या सणांच्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत. हे तुष्टीकरण आहे, ते म्हणाले.”हिंदूंच्या भावनांवर अशाप्रकारे तोडफोड करणे चांगले नाही. बिहारचे हिंदू पाहत आहेत आणि त्यांना हा पक्षपातीपणा दिसत आहे, वेळ आल्यावर ते चोख प्रत्युत्तर देतील. हा निर्णय बदलला पाहिजे आणि भाजप या प्रकरणी शांत बसणार नाही, ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा:
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंचा जामीन अर्ज फेटाळला
अंधेरीच्या ईएसआयसी रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदलीमुळे रुग्णांचे हाल
शब्द मागे घेऊन, विषय संपेल का?
स्टॅलिन, अखिलेश यांच्या उपस्थितीत व्ही.पी. सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे आश्चर्य
सुट्टीचे कॅलेंडर मागे घेण्याची मागणी करत मंत्री म्हणाले की, भाजप यावर गप्प बसणार नाही. “अशा प्रकारची तुष्टीकरणाची वागणूक बिहारमध्ये चालणार नाही. तुष्टीकरण हे देशाच्या विकासासाठी घातक आहे त्यामुळे नितीश सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, असेही ते म्हणाले.
यापूर्वी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनीही सुट्टीच्या कॅलेंडरवरून नितीश सरकारवर निशाणा साधला होता. “पुन्हा एकदा काका-पुतण्या सरकारचा हिंदुविरोधी चेहरा समोर आला. एकीकडे, मुस्लिम सणांच्या सुट्ट्या शाळांमध्ये वाढवल्या जात आहेत, तर हिंदू सणांच्या सुट्ट्या रद्द केल्या जात आहेत, असे ट्विट अश्विनी चौबे यांनी केले होते.