सोमवारी सायंकाळी बेपत्ता झालेली केरळची सहा वर्षीय मुलगी कोल्लममधील आश्रम मैदानातून बेवारस अवस्थेत सापडली आहे. केरळ पोलिसांच्या २० तासांच्या शोध मोहिमेनंतर मुलगी सापडली.
केरळमधील कोल्लम जिल्ह्यात सोमवारी शिकवणीला जात असताना सहा वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते.मुलीच्या शोधासाठी पोलिसांकडून राज्यभर शोध मोहीम सुरु करण्यात आली.त्यांनतर केरळमधील कोल्लम आश्रमाच्या मैदानात ती मुलगी बेवारस अवस्थेत सापडली.घटनेच्या काही तासांनंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी स्थानिक पोलिसांशी संवाद साधला आणि या प्रकरणाचा जलद तपास करण्याचे आदेश दिले.
हे ही वाचा:
‘मुंबई आता जुनी झाली, बॉलीवूड हैदराबादला जाणार!’
ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक
वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली
पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याने काश्मीरच्या विद्यार्थ्यांना अटक
वृत्तवाहिन्यांनी सोमवारी वृत्त दिले की, अपहरणकर्त्यांनी मुलीच्या पालकांना कॉल केला होता.मुलीच्या परतीसाठी त्यांनी १० लाख रुपयांची मागणी पालकांकडे केली होती.कॉल केल्यानंतर केरळ पोलीस अलर्ट झाले आणि त्यांनी शोध मोहिमेला गती दिली.कोल्लम, पठाणमथिट्टा आणि तिरुअनंतपुरम या दक्षिणेकडील जिल्ह्यांतील सर्व प्रमुख आणि लहान रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे.
मुलीच्या आठ वर्षीय भावाने दिलेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्यांनी पांढऱ्या रंगाच्या कारमधून येऊन मुलीचे अपहरण केले होते.यामध्ये चार महिलांचा समावेश असल्याचा संशय होता.आपल्या बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात पीडितेच्या भावाच्या गुडघ्याला दुखापत झाली, असे पोलिसांनी सांगितले.ही घटना सोमवारी दुपारी ४ ते ४.३० च्या दरम्यान घडली.अखेर मुलीची सुटका झाली आहे.मुलांचे पालक खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात.