उत्तरकाशीमधील सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १५ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांच्या सुटकेसाठी अद्यापही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नवनव्या तंत्राचा वापर करून मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता मजुरांचे मानसिक स्वास्थ्य ठीक राहावे यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. मजुरांच्या मानसिक स्वास्थ्याची पाहणी रोबोच्या मदतीने केली जाणार आहे. त्यासाठी भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे रोबोटिक्स तज्ज्ञ मिलिंद राज यांनी सांगितले आहे.
मिलिंद राज म्हणाले की, “सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मानसिक आरोग्य तपासण्यासाठी येथे आलो आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञान आहे. मजुरांच्या मानसिक आरोग्यावर आता रोबो लक्ष ठेवणार आहे. कामगारांच्या आरोग्यावर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा आहे.”
या रोबोटिक तंत्रज्ञानात तीन गोष्टींचा समावेश आहे. वायू शोधण्याच्या यंत्रणेव्यतिरिक्त इंटरनेट सेवाही याद्वारे पुरविली जाते. अडकलेल्या मजुरांच्या जागेपासून १०० मीटर अंतरावरून त्यांच्या आरोग्यावर रोबोद्वारे लक्ष ठेवता येते. पूर्वी लखनौमध्ये एक इमारत कोसळून होती. त्यानंतर १४ जणांना ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढले होते. त्यावेळी वापरलेल्या रोबोटिक यंत्रणेचीच मदत आता घेतली जाणार आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकरचा आवाज बंद
नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार
हमासकडून तिसऱ्या टप्प्यात १४ इस्रायली, ३ थाई नागरिकांसह १७ ओलिसांची सुटका!
अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!
रोबोटिक अभियंता मिलिंद राज हे लखनौचे रहिवासी आहेत. भारतीय लष्कराला तांत्रिकदृष्ट्या मजबूत करण्याचे काम ते करतात. त्यांनी तयार केलेल्या ड्रोनचा वापर भारतीय लष्करात केला जात आहे. अडकलेल्या मजुरांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांचा कुटुंबाशी संपर्क होणे आवश्यक असून त्यासाठी इंटरनेटसारखी सुविधा दिली जाणार आहे. रोबोमध्ये अतिनील किरणांचाही वापर करणार. जंतूंच्या नाशासाठी ही अतिनील किरणे उपयुक्त आहेत. मजूर आजारी पडू नयेत आणि मानसिक स्थिती चांगली राहण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे मजुरांना आत ऊन मिळत नाही. याशिवाय अन्य अनेक समस्या आहेत. यामुळे ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असले तरी मानसिकदृष्ट्या खचले तर समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे त्यांना मानसिक आधार द्यायला हवा, असे राज यांनी म्हटले आहे.