उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका १२ वीच्या विद्यार्थ्यावर तरुणांच्या एका गटाने हल्ला केला आणि तोंडावर लघुशंका केली, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका निर्जन ठिकाणी एका विद्यार्थ्याला मारहाण करताना दिसत आहे तर इतर दोन साथीदार प्रेक्षक बनून या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत.पीडित विद्यार्थी मारहाण थांबवण्याची विनंती करत असताना त्या व्यक्तीने पीडित विद्यार्थ्याच्या डोक्यावर आणि पाठीवर मारताना दिसत आहे.आणखी एका व्हिडिओमध्ये पीडित विद्यार्थ्याच्या तोंडावर दुसरी व्यक्ती लघुशंका करताना दिसत आहे.
या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला.या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे.यातील चौघांची ओळख अवि शर्मा, आशिष मलिक, राजन आणि मोहित ठाकूर अशी झाली असून इतर अज्ञात आहेत.१३ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.मेरठचे एसपी पियुष सिंग यांनी सांगितले की,एका तरुणाला मारहाण करत त्याच्या तोंडावर लघुशंका केली.पीडित तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे, आम्ही तक्रार नोंदवली आहे आणि एका व्यक्तीला अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीवर कलम २९४ अंतर्गत( सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याबद्दल आणि अपमानास्पद कृत्य केल्याबद्दल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत असे पोलीस अधिकारी पीयूष सिंह यांनी सांगितले.
हे ही वाचा:
नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार
अमेरिकेतील भारतीय राजदूताला खलिस्तानी समर्थकांची धक्काबुक्की!
हमासकडून तिसऱ्या टप्प्यात १४ इस्रायली, ३ थाई नागरिकांसह १७ ओलिसांची सुटका!
अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!
पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, पीडित विद्यार्थी शहरातील आपल्या नातेवाईकांना भेटून परत येत असताना, तरुणांच्या एका गटाने त्याचे अपहरण करत निर्जन स्थळी घेऊन गेले आणि त्याला जबर मारहाण केली. विद्यार्थी घरी परत न आल्याने आम्ही त्याचा रात्रभर शोध घेतला.त्यांनतर दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यार्थी घरी परतला आणि त्याने घडलेली संपूर्ण घटना आम्हाला सांगितली, असे पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले.
त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, सुरुवातीला कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप वडिलांनी केला.१६ नोव्हेंबरला पुन्हा पोलीस ठाण्यात गेल्यांनतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले.तसेच अपहरणाचा आरोप टाळून हलक्या आयपीसी कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
काही हल्लेखोर हे पीडित मुलाचे मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्यात कोणताही वाद नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.आरोपींवर दंगल करणे, स्वेच्छेने दुखापत करणे, शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे या तरतुदींनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.