भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या नैनितालमध्ये सुट्टी घालवत आहे.’क्रिकेट विश्वचषक २०२३’ संपल्यानंतर शमी विश्रांतीचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा चर्चेत आला.मोहम्मद शमीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करताना दिसत आहे.मोहम्मद शमीने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तो खूप भाग्यवान आहे, देवाने त्याला दुसरं आयुष्य दिले आहे.
नैनितालमध्ये त्यांची कार डोंगराळ रस्त्यावरून खाली पडली. ते माझ्या गाडीच्या समोरून चालत होते. आम्ही त्यांना गाडीतून सुखरूप बाहेर काढले. व्हिडिओमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज आणि त्याचे सहकारी अपघातग्रस्त कारजवळ उभे असल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा:
लग्न परदेशात कशाला, इथेच करा आत्मनिर्भर भारतासाठी!
एस. जयशंकर म्हणाले, ‘भारताला स्वतःच्या नरेटिव्हची गरज’
पाकिस्तान झाला बेहाल; नागरिकांना अन्न मिळणंही झालंय कठीण!
पत्रकार सौम्या विश्वनाथनच्या मारेकऱ्यांना १५ वर्षांनी जन्मठेप
विश्वचषक स्पर्धेतील शमीची कथा एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटासारखी होती. सुरुवातीला तो प्लेइंग इलेव्हनमध्येही होता, पण हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर रोहित शर्माने शार्दुल ठाकूरला काढले व मोहम्मद शमीला आत घेतले.मोहम्मद शमीला पहिल्या चार सामान्यांपासून दूर रहावे लागले.त्यांनतर न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात शमीने धमाकेदार इंट्री केली व सामन्यात ५ विकेट्स घेतले.वेगवान गोलंदाज शमीने विश्वचषकातील ७ सामन्यात १०.७१ च्या सरासरीने २४ विकेट घेतल्या.मात्र, दुर्दैवाने टीम इंडियाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हृदयद्रावक पराभवाला सामोरे जावे लागले.परंतु, विश्वचषक सामन्यात भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून शमीची नोंद झाली.दरम्यान, विराट कोहलीला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आणि तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या टी-२० मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आहे. या मालिकेसाठी शमीसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे.