28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरसंपादकीयअंतरावालीत पिस्तुलासह अटक झालेला ऋषीकेश बेदरे कोण?

अंतरावालीत पिस्तुलासह अटक झालेला ऋषीकेश बेदरे कोण?

देवेंद्र फडणवीसांचा द्वेष कोणत्या स्तरापर्यंत पोहोचला हे बेदरेच्या फेसबुक पेजवरून लक्षात येते

Google News Follow

Related

दोन महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरावालीत उपोषण सुरू असताना दगडफेक झाली होती. अनेक पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले होते. जखमी झालेल्यांचा सरकारी आकडा ३२ होता. पोलिसांनी याप्रकरणी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. ऋषीकेश बेदरे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि तीन काडतुसं जप्त करण्यात आली आहे. आंदोलनाच्या आडून जाळपोळ आणि हिंसा करणाऱ्यांना हा दणका आहे. दबावाखाली झुकणार नाही, असे स्पष्ट संकेत राज्य सरकारने दिले आहेत.

 

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सभा घेत फिरणारे मनोज जरांगे पाटील प्रत्येक सभेत आमच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, असे सांगत फिरत आहेत. आरक्षण आंदोलना दरम्यान जाळपोळ झाली, पोलिसांवर दगडफेक झाली. लोक जखमी झाले. त्यात सामील असलेल्या लोकांना सोडण्यासाठी जरांगेंचा दबाव होता. राज्य सरकार या दबावासमोर झुकणार काय? कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवणाऱ्यांना मोकाट सोडणार काय? हा प्रश्न महत्वाचा होता. सुदैवाने राज्य सरकार दबणार नाही, असे स्पष्ट संकेत आजच्या कारवाईमुळे मिळाले आहेत.

 

आज ज्या ऋषीकेश बेदरेला अटक तो कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्याचे फेसबुक प्रोफाईलवर पाहिल्यानंतर लक्षात आले की तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे. आता ही राष्ट्रवादी काँग्रेस कोणती? अजित पवारांची की शरद पवारांची हे समजणे फार कठीण नाही. त्याच्या पेजवर अजित पवारांवर टीका करणाऱ्या काही पोस्ट आहेत. आपल्याकडच्या राजकारणात नेत्यावर टीका करण्याची पद्धत नाही. अशी टीका केली तर पक्षात राहण्याची सोय नसते. विरोधी नेत्यावर टीका केली तर राजकारणातील स्थान मजबूत होते. बेदरे यांनी अजित पवारांवर टीका केली, त्यावरून त्यांच्या निष्ठा शरद पवारांना वाहीलेल्या आहेत, हे स्पष्ट दिसते.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काही लोकांच्या मनात किती द्वेष आहे, हे बेदरेचे फेसबुक प्रोफाईल पाहिल्यावर लक्षात येते. एक लहान मुलगा फडणवीसांच्या फोटोवर लघुशंका करतोय, असे या फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे. ही पोस्ट तर स्पष्ट सांगते आहे की, बेदरे थोरल्या पवारांचा चेला आहे. दगडफेक प्रकरणात याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भादवी कलम ३०७ सह काही कठोर कलमं लावण्यात आली आहेत. खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला हे कलम लावले जाते. हा गुन्हा दखलपात्र असून १० वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे. बेदरे याला २ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

‘दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळेल’ परंतु त्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल!

आता संजय राऊत म्हणतात, इस्रायलला दुखावण्याचा हेतू नव्हता!

एनआयएच्या कारवायांमुळे काश्मीरमधील दहशतवादी हवालदिल!

राहुल गांधी म्हणजे ‘फ्यूज ट्यूबलाइट’, मेड इन चाइना!

अंतरवाली सराटीमध्ये १ सप्टेंबरला झालेल्या दगडफेकीत किती पोलिस जखमी झाले, त्याचा तपशील सर्वात आधी छगन भुजबळ यांनी अंबडच्या सभेत जाहीर केला होता. महिला पोलिसांना कसे लक्ष करण्यात आले, त्याची माहीती आकडेवारीसह जारी केली होती. सरकारच्या मंत्रिमंडळातील एक सदस्य पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचा तपशील देतो, तरीही जर दोषींवर कारावाई होत नाही, तर महायुतीचे सरकार आणि काँग्रेस आघाडीचे सरकार यामध्ये काहीच फरक उरत नाही.

 

२०१२ मध्ये आझाद मैदानावर रझा अकादमीने काढलेल्या मोर्चात पोलिसांवर हल्ले झाले. परंतु दोषींवर कारवाई झाली नाही. याचा थेट परिणाम पोलिसांच्या मनोधैर्यावर होतो. दंगेखोराचा हात पकडण्याची पोलिसांची हिंमत संपते. पोलिस कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापेक्षा आपला जीव आणि नोकरी अबाधित राहील याची काळजी घेऊ लागतात. महायुती सरकारने ही चूक टाळली. पोलिसांचे मनोधैर्य ढासळणार नाही. दंगेखोरांचे वाढणार नाही, याची काळजी सरकारने घेतली.
ही कारवाई झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया अपेक्षितच आहे. आमच्यावर हल्ला झाला आणि कारवाई सुद्धा आमच्यावरच? या मागे सरकारचा कोणता डाव आहे? असा सवाल त्यांनी केला. हा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. सरकारने आमच्या लोकांना अटक करणार नाही असे आश्वासन दिले होते. मग आता अटक का केली जात आहे? निष्पाप लोकांवर अन्याय होऊ नये असे त्यांनी म्हटले आहे.

 

महाराष्ट्रात असे निष्पाप लोक पिस्तुलं घेऊन फिरायला लागले तर एकूणच परीस्थिती कठीण होऊन बसणार आहे. जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर राज्य पेटायला वेळ लागणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फार व्यक्त होत नाही, अशा प्रकारचे चित्र आहे. यांनी सुदैवाने या विषयावर सडेतोड भूमिका मांडली आहे. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. प्रशासनाने त्यांचे काम करायला हवे, असे पवार म्हणाले आहेत.

 

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे, असा टोला अजित पवारांनी मारला आहे. हा टोला फक्त छगन भुजबळ यांना आहे, असे मानण्याचे काही कारण नाही. कारण अलिकडे बोलण्याच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील यांनी संजय राऊतांनाही मागे टाकले आहे. २५ डिसेंबर रोजी जरांगे यांनी मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला आहे. जरांगे हे सांताक्लॉज आहेत का? असा सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. परंतु राज्य सरकारने जो संकेत दिला आहे, तो महत्वाचा आहे. हिंसा करणाऱ्यांना माफी नाही, असा स्पष्ट इशारा बेदरे याच्यावर झालेल्या कारवाईने दिला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा