विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संघाला भेटण्यासाठी त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये आले होते. त्यांच्यामुळे आम्हा सर्वांचाच आत्मविश्वास उंचावला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ड्रेसिंग रूममध्ये आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक खेळाडूची वैयक्तिकरीत्या भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यांनी एकूण स्पर्धेतील उत्तम कामगिरीबाबत शामी याचे कौतुक केले आणि त्याला मिठी मारली. शामी याने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत अधिक सांगितले. आमचे मनोबल खचले असताना पंतप्रधानांनी आम्हाला धीर दिला. अशाप्रकारचे दिलासादायक शब्द आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण तुमचा धीर आधीच खचलेला असतो,’ असे शामी म्हणाला.
हे ही वाचा:
आठ माजी नौदल कर्मचाऱ्यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधातील भारताचे अपील कतारने स्वीकारले!
रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती!
“एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर टर्मिनल २ उडवणार” मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल
सचिन वाझेला तुरुंगात हवेय मांजराचे पिल्लू
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाद्वारेही भारतीय संघाचे कौतुक करणारी पोस्ट केली. ‘प्रिय भारतीय संघ, विश्वचषक स्पर्धेत तुमची प्रतिभा आणि दृढनिश्चय लक्षात घेण्याजोगा होता. तुम्ही मोठ्या भावनेने खेळलात आणि देशासाठी अभिमानास्पद कामगिर केली. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत,” असे पंतप्रधान मोदी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, तसेच, त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचेही कौतुक केले.
‘एकंदरित आम्ही चांगला खेळ केला. कौशल्यात आणि आत्मविश्वासात कोणतीही उणीव नव्हती. मला वाटते, कधी कधी संघाला, एखाद्या वाईट दिवसाला सामोरे जावे लागते आणि तो दिवस कधीही येऊ शकतो. तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. आम्ही अंमलबजावणीत कमी पडलो. धावांमध्ये कमी पडलो. तो दिवस आमचा नव्हता. पण असे काही नव्हते की ज्यामुळे आमचे मनोबल आणि आत्मविश्वास खचला होता, अशी प्रतिक्रिया शामी याने दिली.