इस्त्रायल आणि हमास यांच्या युद्धबंदीच्या करारानुसार आज शुक्रवार पासून चार दिवस युद्ध बंदीला सुरुवात झाली.आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सततच्या दबावानंतर इस्रायलने चार दिवसांसाठी युद्धविराम करण्यास सहमती दर्शवली होती.करारानुसार हमासने अपहरण केलेल्या ५० नागरिकांची आता सुटका होणार आहे.त्यानुसार हमास आज १३ नागरिकांची एक तुकडी ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असेल त्यांना सोडणार आहे.तसेच इस्रायलकडून काही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे, असे बीबीसीने वृत्त दिले आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध बंदीचा करार नुकताच झाला होता.करारानुसार इस्रायली सैन्य गाझापट्टीमध्ये चार दिवस हल्ले थांबवणार आहे.मात्र, त्या बदल्यात अपहरण केलेल्या ५० नागरिकांची सुटका हमसला करावी लागणार होती.इस्रायलच्या मंत्रिमंडळाने बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी या कराराला मंजुरी दिली होती.हमासने या कराराचे स्वागत केले होते आणि बंदी बनवण्यात आलेल्या नागरिकांच्या एका तुकडीला गुरुवार पर्यंत सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
हे ही वाचा:
रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती!
“एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर टर्मिनल २ उडवणार” मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल
सचिन वाझेला तुरुंगात हवेय मांजराचे पिल्लू
प्रकाश राज यांना १०० कोटी रुपयांच्या घोटाळयाप्रकरणी ईडीचे समन्स
त्यानुसार आज शुक्रवारी हमासकडून बंदी बवण्यात आलेल्या ५० नागरिकांपैकी १३ नागरिकांची सुटका होणार आहे.तसेच इस्रायलकडे देखील १५० पॅलेस्टिनी कैदी आहेत, ज्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. करारानुसार इस्रायल देखील काही पॅलेस्टिनीना सोडणार आहे.इस्रायल आणि हमास यांच्यात सुमारे सात आठवडे चाललेल्या संघर्षानंतर अखेर शुक्रवारी चार दिवसीय युद्धविराम सुरू झाला.
दरम्यान, इस्रायलकडून सुरु करण्यात आलेल्या ‘स्वोडर्स ऑफ आयर्न’ या मोहिमेअंतर्गत गाझा पट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई आणि जमिनीवर हल्ले करण्यात आले.या हल्ल्यात आतापर्यंत १४,८५४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, ज्यामध्ये ५,८५० लहान मुलांचा समावेश आहे.