बॉलिवूडचे अभिनेते प्रकाश राज यांच्या अडचणीत वाढ झाली असून ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. ईडीने समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी १० दिवसांत हजर राहण्यास सांगितले आहे. प्रणव ज्वेलर्स मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने प्रकाश राज यांना समन्स बजावला आहे. १०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी प्रकाश राज यांचे नाव समोर आले आहे.
अभिनेते प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्सचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहेत. पॉन्झी स्कीम घोटाळ्याप्रकरणी, ईडीने तमिळनाडूच्या त्रिची येथील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्सवर छापे टाकले होते. छापेमारीनंतर प्रकाश राज यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही व्यक्तींद्वारे चालवण्यात येणाऱ्या पॉन्झी स्कीम प्रकरणात प्रणव ज्वेलर्सचे देखील नाव समोर आले आहे. तपासादरम्यान ईडीने काही कागदपत्रे, २३.७० लाख रुपयांची रक्कम आणि काही दागिने जप्त केले आहेत.
हे ही वाचा:
अंधारेबाईना अचानक का आला भुजबळांचा कळवळा?
डीपफेक लोकशाहीसाठी नवा धोका; आळा घालण्यासाठी नियमन करणार
इस्लामविरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या हाती नेदरलँडची सत्ता?
मोसाद निघणार हमास दहशतवाद्यांच्या शोधात!
माहितीनुसार, छापेमारीत ईडीला अनेक कागदपत्रे सापडली होती ज्यातून काही संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाली असल्याचं देखील समोर आले आहे. त्रिचीच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या माहिती अहवालानंतर ईडीने तपास सुरु केला होता. प्रणव ज्वेलर्सने उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन १०० कोटी रुपये सामान्य जनतेकडून घेतले आहेत. यासाठी काही लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली. पण प्रणव ज्वेलर्स आणि इतर संबंधीत व्यक्ती सामान्य जनतेचे पैसे परत करण्यात असमर्थ ठरले. त्यांनी सामान्य जनतेची दिशाभूल केली आणि शोरुम बंद केलं.