इस्रायलने आता केवळ गाझा पट्टीतूनच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून हमासचा नायनाट करण्याचा निर्धार केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपून बसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी देशाची गुप्तचर संस्था मोसादला आदेश दिले आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले, ‘हमासचे प्रमुख जिथे असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मी मोसादला दिले आहेत.’हमासचे बहुतेक शीर्ष नेतृत्व गाझा पट्टीत राहत नाही परंतु प्रामुख्याने कतारची राजधानी आणि लेबनॉनची राजधानी बेरूत आणि आखाती राज्यांमध्ये राहतात. गेल्या काही वर्षांत परदेशात पॅलेस्टिनी दहशतवादी आणि इराणच्या अणुशास्त्रज्ञांच्या हत्या केल्याचा आरोप मोसादवर होत आहे. दरम्यान, इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने सांगितले की, गाझाच्या हमास राज्यकर्त्यांसोबत चार दिवसांच्या युद्धविराम करारानुसार ओलिसांना शुक्रवारपूर्वी सोडले जाणार नाही.
हे ही वाचा:
ब्रिक्स सदस्यत्वासाठी पाकिस्तानचा अर्ज!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध; चार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!
मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!
हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता इस्रायली तरुणीचा मृतदेह सापडला!
७ ऑक्टोबर रोजी हमासच्या सैनिकांनी अचानक इस्रायलवर हल्ला केला, ज्याला इस्रायली सैन्याने ८ ऑक्टोबरपासून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून गाझामध्ये इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात १४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासचे अनेक टॉप कमांडरही मारले गेले आहेत. याशिवाय लष्कराने हमासचे हजारो तळही उद्ध्वस्त केले आहेत.हवाई हल्ल्यांसोबतच इस्रायली लष्कराने गाझा पट्टीत जमिनीवर हल्लेही तीव्र केले आहेत. दरम्यान, मध्यस्थीमुळे इस्रायल आणि हमास यांच्यात चार दिवसांचा युद्धविराम लागू करण्यात आला आहे. यावेळी, दोन्ही बाजूंनी ओलिसांची सुटका केली जाईल. मात्र, बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, युद्धविराम संपल्यानंतर त्यांचे सैन्य हमासवर पुन्हा हल्ले करतील.