दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीरमधील चार सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवायांना परावृत्त करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने बुधवारी केंद्रशासित प्रदेशातील दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून डॉक्टर आणि एका पोलिसासह अशा चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
गेल्या ३ वर्षात म्हणजे कलम-३७० रद्द केल्यापासून, अशा आरोपांमुळे ५० हून अधिक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. या लोकांवरील दहशतवाद्यांशी संबंध, त्यांना मदत करणे आणि त्यांच्यासाठी निधीची व्यवस्था करणे असे आरोप खरे ठरले आहेत.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान काकर यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून समन्स
मराठा राहिला बाजूलाच, मुस्लिम आरक्षणासाठी दोन्ही काँग्रेसची बँटींग…
साडेतीन कोटी खर्च केल्याचा आरोप हास्यास्पद!
हमासने ५० ओलिसांना सोडल्यावरच इस्रायल चार दिवस हल्ले थांबवणार!
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयातील सहायक प्राध्यापक (औषध), निसार-उल-हसन, हवालदार अब्दुल मजीद भट, उच्च शिक्षण विभागातील प्रयोगशाळा कर्मचारी अब्दुल सलाम राथेर आणि शिक्षण विभागातील शिक्षक फारुख अहमद मीर या चार सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.भारतीय राज्यघटनेच्या कलम ११ अन्वये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.हे चार सरकारी कर्मचारी दहशतवाद्यांना मदत करत होते.
सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने घटनेच्या कलम ३११ (२) (सी) चा वापर करून ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. हे लोक पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना मदत करत होते, दहशतवाद्यांच्या विचारसरणीचा प्रचार करत होते, तसेच निधी गोळा करत होते आणि फुटीरतावादी अजेंडा पुढे नेण्याचे काम करत होते.