23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषबोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेचा मार्ग केवळ सहा मीटर दूर

बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेचा मार्ग केवळ सहा मीटर दूर

Google News Follow

Related

दिवाळीच्या दिवशी उत्तरकाशीमधील काम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेल्या ४१ श्रमिकांना अद्याप बाहेर काढण्यात आलेले नाही. बचावमोहिमेचा गुरुवारचा ११वा दिवस आहे. आता कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ ६ मीटरचे अंतर खोदकाम बाकी आहे.

आता अवघ्या काही तासांत कामगारांची सुटका होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. चिनूक हेलिकॉप्टर लवकरच चिन्यालीसौड विमानतळावर पोहोचणार आहे. श्रमिकांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता भासल्यास हे हेलिकॉप्टर मदतीसाठी सज्ज असेल. बोगद्याबाहेर रुग्णवाहिकाही सर्व वैद्यकीय मदतीसाठी सुसज्ज आहे.

बचावमोहीम शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. एक-दोन तासांत कामगारांना बाहेर काढता येईल. कामगारांना बाहेर काढण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे. ढिगाऱ्यात अडकलेल्या स्टीलच्या तुकड्यांना कापून हटवले जात आहे. त्यामुळे श्रमिक लवकरच बाहेर पडतील, असा विश्वास बचाव मोहिमेतील एक सदस्य गिरिश सिंह रावत यांनी व्यक्त केला.

बुधवारी दिवसभर ड्रिलिंगच्या दरम्यान भुयारात राहाताना प्रोजेक्ट हेड हरपाल सिंग यांनी श्रमिकांशी अनेकदा चर्चा केली. श्रमिक व्यवस्थित बोलत आहेत. तसेच, हा बोगदा तेच बनवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतरही हे श्रमिक निराश झालेले नाहीत.

हे ही वाचा:

आयसीसीकडून बंदी; ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू मॅकगेहे यांची निवृत्ती!

अंतिम सामन्यातील पराभवाच्या कामगिरीत काही कर्णधारांचे सातत्य

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाला जिवंत करण्याचा दावा; मृतदेहाच्या बाजूला तासन् तास झोपला मांत्रिक!

मनसेचे पुन्हा खळखट्याक!

श्रमिकांचे स्वागत आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी बुधवारी संध्याकाळीच उत्तरकाशी येथे पोहोचले आहेत. जेव्हा श्रमिक बाहेर येतील, तेव्हा मुख्यमंत्री त्यांचे स्वागत करतील. बोगद्याच्या दुर्घटनेनंतर आता सुरक्षाव्यवस्थेसाठी सरकार तयारीला लागले आहे. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक देशभरातील काम सुरू असलेले बोगदे, भुयारी मार्गांचे सुरक्षा ऑडिट करणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा