25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषBYJU'S ने ९,००० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ईडीचा आरोप!

BYJU’S ने ९,००० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ईडीचा आरोप!

घोटाळ्याचे पुरावे ईडीच्या हाती

Google News Follow

Related

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी बायजू यांना ९,००० कोटी रुपयांच्या विदेशी चलन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली, असे विविध माध्यमांच्या अहवालात म्हटले आहे.ईडीच्या तपासात बायजूविरुद्ध पुरावे सापडल्याने अंमलबजावणी संचालनालयाने थेट बायजूवर ९,००० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी डिजिटल एज्युकेशन कंपनी बायजू विरोधात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.तब्बल ९,००० कोटी रुपयांचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.ईडीच्या तपासात असे आढळून आले की, बायजूने बेकायदेशीरपणे परदेशात असलेल्या त्याच्या उपकंपन्यांना पैसे पाठवले आहेत.

ईडीने आरोप केला आहे की, बायजूने आपल्या भारतीय कर्मचार्‍यांना पगार आणि भत्ते देण्यासाठी परदेशी उपकंपन्यांना पैसे पाठवले आहेत.तथापि, प्रत्यक्षात, बायजूने या निधीचा वापर आपली आर्थिक कामगिरी सुधारण्यासाठी केला आहे. ईडीच्या या कारवाईमुळे बायजूच्या अडचणी वाढल्या आहेत. कंपनीला आता मनी लाँड्रिंग आणि गैरव्यवहाराच्या आरोपांना सामोरे जावे लागणार आहे.

हे ही वाचा:

इस्रायलकडून युद्धविराम झाला नाही तर असेच होणार अपहरण!

भारत-ऑस्ट्रेलिया करणार चीनच्या आव्हानांचा एकजुटीने सामना

राम मंदिरातील पुजारी पदासाठी आले तब्बल ३ हजार अर्ज!

पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्याच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ईडीच्या या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे.ही कारवाई डिजिटल एज्युकेशन कंपन्यांवर करण्यात येणारी महत्त्वाची कारवाई असल्याचे लोकांचे मत आहे. यामुळे भविष्यात अशा कंपन्यांवर कारवाई करण्याचा आदर्श निर्माण होईल.

मात्र, बायजू कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. ईडीच्या तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. तसेच कंपनीने म्हटले आहे की, आमची कंपनी कोणतेही चुकीचे काम करत नाही.दरम्यान, बायजू ही भारतातील सर्वात मोठी डिजिटल शिक्षण कंपनी आहे.कंपणीचे मालक रवींद्रन बायजू आहेत.ही कंपनी अमेरिकन कंपनी टायगर ग्लोबलने २०२१ मध्ये १५.५ अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली होती.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा