27 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेष‘मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यास मी खूप उत्सुक’

‘मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यास मी खूप उत्सुक’

सॅम अल्टमन यांची प्रतिक्रिया

Google News Follow

Related

ओपनएआय कंपनीच्या सीईओपदवारून हकालपट्टी करण्यात आलेल्या सॅम अल्टमन यांना मायक्रोसॉफ्टने आमंत्रित केले आहे आणि त्यांनीही हे आमंत्रण स्वीकारले आहे. सोमवारी अल्टमन यांनी ते मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘आम्ही पूर्वीपेक्षा अधिक एकजुटीने, वचनबद्धतेने आणि संपूर्ण लक्ष केंद्रित करून काम करू. एक संघ म्हणून, एक मोहीम म्हणून आम्ही सर्वजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने एकत्र काम करणार आहोत आणि मी यासाठी खूप उत्साहित आहे,’ अशी प्रतिक्रिया अल्टमन यांनी एक्सवर दिली आहे. त्यांनी दुसरीही पोस्ट करून ओपनएआयची भरभराट होत राहावी, हे त्यांचे आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचे प्राधान्य आहे, असेही नमूद केले आहे.

‘सत्या आणि माझे सर्वोच्च प्राधान्य हे ओपनएआयची सतत भरभराट होत राहावी, हे असेल. आम्ही आमच्या भागीदारांना आणि ग्राहकांना सातत्यपूर्ण चांगली सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. ओपनएआय/मायक्रोसॉफ्ट भागीदारीमुळे हे शक्य होईल,” असा विश्वास अल्टमन यांनी व्यक्त केला आहे.

रविवारीच, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी त्यांचे माजी सहकारी, ग्रेग ब्रॉकमन यांच्यासह टेक जायंट फर्ममध्ये ऑल्टमनची नियुक्ती जाहीर केली. ते दोघेही नवीन प्रगत एआय संशोधन गटाचे नेतृत्व करणार आहेत, असे नडेला म्हणाले. “आम्ही ओपन एआय सोबतच्या आमच्या भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत आणि आमचा आमच्या उत्पादननिर्मितीच्या भविष्यवेधी मार्गावर विश्वास आहे. आम्ही मायक्रोसॉफ्टने जाहीर केलेल्या प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणण्याची आमची क्षमता वाढवून आमच्या ग्राहकांना आणि भागीदारांना सहकार्य करण्यासाठी सज्ज आहोत,’ असे नाडेला यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

“आम्ही एमेट शीअर आणि ओपन एआयच्या नवीन नेतृत्व कार्यसंघाला जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. सॅम अल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन हे सहकारी नवीन प्रगत एआय संशोधन कार्यसंघाचे नेतृत्व करण्यासाठी मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार आहेत. त्यांच्या यशासाठी आवश्यक संसाधने प्रदान करण्यासाठी आम्ही त्वरित मार्गक्रमण करण्यास उत्सुक आहोत,’ असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला म्हणाले.

हे ही वाचा:

अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स

‘भारताचे फलंदाज चांगले खेळले नाहीत; खेळपट्टीला दोष देणार नाही’

पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या

भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?

दुसरीकडे, ओपन एआयने ट्विचचे माजी प्रमुख एम्मेट शीअर यांची ऑल्टमन यांच्या ऐवजी सीईओपदी नियुक्ती केली आहे. शनिवारी, ओपनएआय, चॅटजीपीटी निर्मात्याने ऑल्टमन यांच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास नसल्याचे सांगत त्यांची हकालपट्टी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा