24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामापोलीस कॉन्स्टेबलची लायब्ररीमध्ये गळफास लावून आत्महत्या

पोलीस कॉन्स्टेबलची लायब्ररीमध्ये गळफास लावून आत्महत्या

प्रेमप्रकरणातून उचलले पाऊल

Google News Follow

Related

मैत्रिणी सोबत झालेल्या भांडणातून पोलीस कॉन्स्टेबल आत्महत्या केल्याची घटना वरळी पोलीस वसाहत येथे घडली. इंद्रजित साळुंखे असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी मुंबई पोलीस दलात भरती झालेला इंद्रजित साळुंखे हा नायगाव मुख्यालय येथील शस्त्रास्त्र विभागात तैनात होता.

 

वरळीच्या पोलीस वसाहत येथे राहणारा इंद्रजित याचे गोरेगाव येथे राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. इंद्रजित याचे मैत्रिणीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. या वादातून त्याने मैत्रिणीला फोन करून आत्महत्या करीत असल्याची धमकी देखील दिली होती. परंतु मैत्रिणीने त्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्याने मैत्रिणीला मृत्यूपूर्वी गळफास घेतलेला फोटो पाठवला होता आणि तिला कळवले की तो गळफास लावून आपले जीवन संपवणार आहे.

हे ही वाचा:

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीसांचे नाहीत!

अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स

भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे हौथी दहशतवाद्यांकडून अपहरण

अबब!! नेपोलियनच्या टोपीला मिळाली भरभक्कम किंमत

त्यानंतर घराजवळ असलेल्या लायब्ररीमध्ये त्याने गळफास लावून आत्महत्या केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजित हा दुसऱ्या मुलीसोबत इन्स्टाग्रामवर चॅट करीत असल्यामुळे मैत्रीण आणि त्याच्यात भांडण झाले होते. या भांडणातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वरळी पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा