अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त अखेर जाहीर झाला आहे. २२ जानेवारी रोजी तिसऱ्या सत्रात ही प्राणप्रतिष्ठा होईल. संपूर्ण देशात उत्सव साजरा करण्याचे आणि घरोघरी अनुष्ठान करण्याचे आवाहन केले जाणार असून संपूर्ण देशभरातील वातावरण उत्साहाने भारलेले केले जाणार आहे. चौथ्या सत्रात देशभरातील भक्तांना रामलल्लाचे दर्शन करता येईल, अशा प्रकारचे नियोजन केले जाणार आहे. हा टप्पा २६ जानेवारीला सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत चालेल. ही मोहीम प्रांतवार चालवली जाईल.
२२ जानेवारी रोजी अभिजित मुहूर्त मृगषिरा नक्षत्रामध्ये दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करतील. या सोहळ्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी साकेत निलयममध्ये रविवारी संघ परिवाराची बैठक झाली. त्यामध्ये या सोहळ्याची चार टप्प्यांत विभागणी करून तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सोहळ्याचा पहिला टप्पा रविवारपासून सुरू झाला असून तो २० डिसेंबरपर्यंत चालेल. यात सोहळ्याचा आराखडा तयार केला जाईल. यासाठी छोट्या छोट्या कार्यकारिणी समित्या बनवण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि खंडस्तरावर प्रत्येकी १०-१० लोकांचा गट बनवला जाणार आहे. या गटांमध्ये मंदिर आंदोलनातील कारसेवकांचाही समावेश केला जाणार आहे. हे गट २५० ठिकाणी बैठका घेऊन या सोहळ्यात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, अशी विनंती करणार आहेत.
दुसऱ्या टप्प्याची सुरुवात १९ जानेवारीपासून होईल. यात घरोघरी संपर्क योजेनंतर्गत १० कोटी कुटुंबांत पूजित अक्षत, रामलल्लाच्या विग्रहाचे चित्र आणि एक पत्रक दिले जाईल. या अंतर्गत लोकांना सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच २२ जानेवारीला दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जाईल.
हे ही वाचा:
‘मेड इन इंडिया’ अंतर्गत एचपी, डेल सारख्या कंपन्या भारतात उत्पादन करणार
गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाखाली सापडला ५५ मिटरचा बोगदा
भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?
द्रविडचा प्रशिक्षक म्हणून अनोखा प्रवास; युवा विश्वचषक ते एकदिवसीय विश्वचषक फायनल
रामनगरीची १४ कोसी परिक्रमा २० नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजून नऊ मिनिटांनी सुरू होईल. परिक्रमेमध्ये तब्बल ४२ किमीचा रस्ता चालावा लागणार आहे. यासाठी रस्ते आणि चौकांची डागडुजी केली जात आहे.