27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनियाभारताने लष्कर मागे घ्यावे, मालदीवने केली विनंती

भारताने लष्कर मागे घ्यावे, मालदीवने केली विनंती

केंद्र सरकारकडे केली मागणी

Google News Follow

Related

मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यानंतर मालदीवमधील राजकीय चित्र पालटले असून शपथ घेऊन २४ तास झाले नाहीत तोपर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. त्यांनी मालदीवमध्ये असलेल्या भारतीय सैन्याला परत बोलवून घेण्याची औपचारिक विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.

 

सत्तेत आल्यास भारतीय सैन्य परत पाठवू असं आश्वासन मुइझ्झू यांनी मालदीवमधील नागरिकांना दिलं होतं. त्यानुसार ते आता भारतातील केंद्र सरकारकडे यासंदर्भात मागणी करत आहेत. शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि मुइझ्झू यांची भेट झाली होती. यावेळी त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपतीपद संभाळल्यानंतर मुइझ्झू म्हणाले होते की, मालदीवमध्ये कोणतेही विदेशी सैन्य असणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल.

 

भारतीय सैनिकांची एक तुकडी गेल्या अनेक वर्षांपासून मालदीवमध्ये तैनात आहे. मंत्रालयाने म्हटलं होतं की, भारतीय जवांनाची द्विपसमूहात मानवीय मदत, आपत्ती मदतकार्य आणि बेकायदेशीर समुद्री घडामोडी यांचा सामना करण्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे. मालदीवमध्ये भारताचे ७० सैनिक आहेत. भारत पुरस्कृत रडार आणि विमानांच्या देखरेखीसाठी हे सैनिक तैनात आहेत. मालदीवमध्ये अनेक मदत कार्यांमध्ये भारतीय सैनिकांची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे.

हे ही वाचा:

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानिमित्त गुगलचे खास डुडल

मुंबईकर ते हिटमॅन! भारताचा कर्णधार रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास

निवृत्त आयएएस अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची संपत्ती राम मंदिराला दान

राष्ट्रपती मुइझ्झू हे इब्राहिम मोहम्मद यांना हरवून सत्तेत आले आहेत. माजी मंत्री आणि मालेचे महापौर राहिलेले मुइझ्झू हे माजी राष्ट्रपती अब्दु्ल्ला यामीन यांचे निकर्टवर्तीय आहेत. अब्दुल्ला यामीन यांनी २०१३ ते २०१८ या आपल्या कार्यकाळात चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. त्यांचेच शिष्य असलेले मुइझ्झू यांनी चीनसोबत घनिष्ठ मैत्रीचे वक्तव्य केली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा