30 C
Mumbai
Sunday, October 27, 2024
घरक्राईमनामामणिपूरमध्ये स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची धमकी देणारा मुआन टॉम्बिंगविरुद्ध गुन्हा

मणिपूरमध्ये स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची धमकी देणारा मुआन टॉम्बिंगविरुद्ध गुन्हा

सरकारला दिला होता इशारा

Google News Follow

Related

मणिपूरमधील कुकी जमातीची संघटना इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमचे (आयटीएलएफ) सरचिटणीस मुआन टॉम्बिंग यांच्या विरोधात चुराचंदपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुआन टॉम्बिंग यांनी स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्देशानुसार चुंराचंदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयटीएलएफचे सरचिटणीस मुआन टॉम्बिंग यांनी बुधवारी रॅली काढली होती. त्यात त्यांनी केंद्र सरकारने आमच्यासाठी स्वतंत्र प्रशासनाची व्यवस्था करावी, अन्यथा आम्ही स्वतः वेगळे प्रशासन तयार करू, असे म्हटले होते. यासाठी सरकारला दोन आठवड्यांची मुदत देत असल्याचा इशारा देखील दिला होता. तसेच टॉम्बिंग यांनी १५ नोव्हेंबर रोजी अल्टिमेटम दिला होता की, जर त्यांना स्वतंत्र प्रशासन दिले नाही तर ते दोन आठवड्यांनंतर चुराचंदपूर, कांगपोकपी आणि टांगनौपोल जिल्ह्यात समांतर प्रशासन तयार करतील. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने आयपीसीच्या कलम १२१-ए, १२४-ए, १५३ आणि १२०-बी अंतर्गत मुआन विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या कलमांमध्ये भारत सरकारविरुद्ध कट रचणे, दंगल भडकावणे, लोकांना भडकावणे, देशद्रोहासह इतर गुन्हेगारी कटाचा समावेश आहे.

हे ही वाचा:

मोहम्मद शामीच्या छोट्या गावाला मिळणार मिनी स्टेडियम, व्यायामशाळा

चॅट जीपीटीची पालक कंपनी ओपन एआयच्या सीईओला दाखविला बाहेरचा रस्ता

भारतीय क्रिकेट टीमचे ‘भगवे’ टी शर्ट ममता बॅनर्जींना नकोसे

मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगमागे पाकिस्तानचा कट

राज्य सरकारने गुरुवारी आयटीएलएफचे विधान नाकारले आणि कुकी गटावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले होते. आयटीएलएफ आणि वादग्रस्त विधानाशी संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कायदेशीर पावले उचलली जातील, असे राज्याचे कायदा मंत्री बसंतकुमार यांनी स्पष्ट केलेय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा