कांदिवली पूर्व विधानसभेत उद्या रविवार, दि. 19 रोजी होणाऱ्या छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते भाविकांना गन्ना वाटप, साडी वाटप तसेच पूजेसाठी आवश्यक साहित्याचे वाटप मोठ्या उत्साहात पार पडले.
भारतीय जनता पक्ष आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि जोशात छठ पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या पूजेच्या निमित्ताने आज कांदिवली पूर्व विधानसभेत लोखंडवाला संकुल येथील महाराणाप्रताप उद्यान आणि पोयसर येथील अजमेरा कंपाउंड येथे भाविक, भक्तांना पूजा साहित्याचे वाटप आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा..
मोहम्मद शामीच्या छोट्या गावाला मिळणार मिनी स्टेडियम, व्यायामशाळा
वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियातील साम्यस्थळे
एक डझनहून अधिक वॉन्टेड दहशतवाद्यांच्या हत्येनंतरही पाकिस्तान शांत का?
मुंबई- अहमदाबाद- मुंबई ‘क्रिकेट स्पेशल’ ट्रेन धावणार!
संपूर्ण विधानसभेत एकूण सहा ठिकाणी रविवारी छठ पूजा होणार असून कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. लोखंडवाला संकुल येथील महाराणा प्रताप उद्यान, साईबाबा मंदिर समोर, हनुमान नगर येथील वडारपाडा रोड क्रमांक २ येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मैदान आझाद चाळ, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह मैदान, गोविंद शेठ चाळ, श्रीराम नगर, दळवी प्लॉट स्कूल मैदान, राम नगर, राजीव गांधी मैदान, ठाकूर कॉम्प्लेक्स, प्रमोद नवलकर उद्यान, ठाकूर कॉम्प्लेक्स तसेच मालाड पूर्व येथील सक्सेरिया चाळ, गोविंद नगर महापालिका शाळेजवळ येथे छठ पूजा संपन्न होणार आहे. या पूजेच्या निमित्ताने आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली आहे.