गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानातील विविध ठिकाणी एक डझनहून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. हे सर्व दहशतवादी भारताच्या मोस्ट वाँटेड यादीमध्ये आहेत. या सर्वांचा मृत्यू संशयास्पदरीत्या झाला आहे. मात्र इतके असूनही पाकिस्तान आणि त्यांच्या ‘पाळीव’ दहशतवादी संघटनांनी या हत्यांबाबत मौन धारण केले आहे. हे सर्व दहशतवादी कमांडर लष्कर-ए-तैबा (एलईटी), हिजबुल मुजाहिदीन, फुटीरतावादी खलिस्तानी आंदोलन आणि जैश-ए-मोहम्मद या प्रतिबंधित संघटनांची संबंधित होते.
नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत लष्कर आणि जेईएमच्या तीन प्रमुख दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्यात मौलाना मसूद अझहरचा निकटचा सहकारी आणि लष्करच्या प्रमुख दहशतवाद्याचाही समावेश आहे.
हे हत्यासत्र सन २०२१मध्ये लाहोरमध्ये लष्कर-ए-तैबाचा संस्थापक आणि सन २००८च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्या हत्येनंतर सुरू झाले. या सर्व हत्या विशिष्ट प्रकारे करण्यात आल्या. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी या सर्वांवर गोळ्या झाडून हत्या केली होती. काहींच्या मते, आपापसांतील भांडणांमध्येच त्यांची हत्या होत असल्याची माहिती पाकिस्तानमधील एका अधिकाऱ्याने दिली. मात्र पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसह तेथील प्रसारमाध्यमेही याबाबत बोलण्यास तयार नाहीत.
हे ही वाचा:
वर्ल्डकपमुळे आयसीसी, देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळणार बुस्ट
मुंबईतील गजबजलेल्या माझगावमध्ये गोळीबार
मोबाईल वर गेम खेळण्यास मना केल्याने मुलाची आत्महत्या
श्रीलंका सरकारकडून बीसीसीआय सचिव जय शहांची माफी
हाफिज सईदच्या लाहोरस्थित घराबाहेर बॉम्बहल्ले झाल्यानंतर सन २०२१मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानने लष्कर, जेईएम, एचयूएम आणि खलिस्तानी फुटीरतावादी आंदोलनाशी संबंधित दहशतवाद्यांच्या संशयास्पद हत्यांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने भारताने वाँटेड म्हणून जाहीर केलेल्या दहशतवाद्यांची ओळखही लपवण्याचा प्रयत्न केलेला नाही.