31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरअर्थजगतवर्ल्डकपमुळे आयसीसी, देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळणार बुस्ट

वर्ल्डकपमुळे आयसीसी, देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळणार बुस्ट

डिज्नी+ हॉटस्टारलाही आर्थिक फायदा

Google News Follow

Related

सध्या जगभरात चर्चा आहे ती आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपची. रविवार, १९ नोव्हेंबर रोजी या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. सर्वत्र क्रिकेटची चर्चा होत असताना या वर्ल्डकपमध्ये आयसीसी, डिज्नी- हॉटस्टार या कंपन्यांची मात्र बक्कळ चांदी झाली आहे. याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेलादेखील होणार आहे.

अहवालानुसार, या विश्वचषकाचे प्रक्षेपण करणाऱ्या डिज्नी+ हॉटस्टारला जबरदस्त फायदा होणार आहे. यामध्ये टीव्हीच्या स्टार नेटवर्कच्या कमाईचा देखील सहभाग आहे. गेल्या कित्येक सामन्यांमध्ये हॉटस्टारवर ह्यूवरशिपचा मोठा रेकॉर्ड झाला आहे. भारत- न्यूझीलंड सेमी-फायनल मॅच तब्बल ५ कोटींहून अधिक लोकांनी ऑनलाईन पाहिला होता.

याशिवाय विश्वचषकात आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल म्हणजेच आयसीसीदेखील फायद्यात आली आहे. आयसीसीला सहा ग्लोबल पार्टनर्स मिळाले आहेत. यामध्ये एमआरएफ टायर्स, बुकिंग डॉट कॉम, इंडसइंड बँक, मास्टरकार्ड, अरामको आणि एमिरेट्स अशा कंपन्यांचा समावेश आहे. या वर्ल्डकपमधून आयसीसीला तब्बल १ हजार २४९ कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे.

यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित करण्यात आला होता. जवळपास सर्वच सामन्यांमध्ये स्टेडियमवर हजारो प्रेक्षक उपस्थित होते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला तब्बल १ लाख प्रेक्षक उपस्थित होते. आता अंतिम सामना देखील तिथेच होणार आहे, त्यालाही एक लाखांपेक्षा जास्त दर्शकांची उपस्थिती दिसण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील गजबजलेल्या माझगावमध्ये गोळीबार

मोबाईल वर गेम खेळण्यास मना केल्याने मुलाची आत्महत्या

श्रीलंका सरकारकडून बीसीसीआय सचिव जय शहांची माफी

दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय

२०१९ साली ब्रिटनमध्ये झालेल्या वर्ल्डकपमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला सुमारे ३ हजार ६०० कोटींचा फायदा झाला होता. मात्र, यंदाच्या भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला १३ ते २० हजार कोटींचा फायदा होण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा