गाझामधील सर्वांत मोठे रुग्णालय असलेल्या अल शिफा रुग्णालय आवारात हमासचे भुयार आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा सापडल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायल आणि हमासमधील तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या मदत पथकाकडून राफाह सीमेवरून गाझा पट्टीत पाठवली जाणारी मदत थांबवण्यात आली आहे.
अल शिफा रुग्णालयाच्या बाहेरच्या परिसरात एक भुयारी मार्ग सापडल्याचा दावा इस्रायल लष्करातर्फे करण्यात आला. इस्रायलच्या सैन्याने बुधवारीच या रुग्णालयात छापा टाकला होता. या रुग्णालयाच्या आडून हमास आपली कारवायांची सूत्रे हलवत होते. अल शिफा आणि अल कुद्स रुग्णालयांतही मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि वैद्यकीय मदत मिळाल्याचे इस्रायलच्या लष्कराने सांगितले. अमेरिकेने मात्र अल शिफा रुग्णालयातील हमासच्या कारवायांबाबत गुप्तचर संस्थांकडून मिळालेली माहिती देण्यास नकार दिला.
इस्रायलने रुग्णालयावर केलेल्या हल्ल्याचा हमासने निषेध केला आहे. रुग्णालयातील भुयारांत शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा ठेवल्याचा इस्रायलचा दावा धादांत खोटा असल्याचा दावा हमासतर्फे करण्यात आला आहे. तर, अल शिफा रुग्णालयात हमासने इस्रायलच्या ओलिसांना ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळेच आम्ही रुग्णालयात छापा मारल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी केला आहे.
हे ही वाचा:
‘चीनने कोणत्याही देशाची एक इंच जमीनही बळकावलेली नाही’
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उबाठाच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक राडा करणं अतिशय निंदनीय
वसईकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात मेहत्तर समाजाची भूमिका महत्त्वाची!
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या दोन गटाच्या कार्यकर्त्यांत धूमश्चक्री
गाझामधील दोन टेलिकॉम कंपन्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या ऊर्जेचा स्रोत संपुष्टात आल्यामुळे गाझामधील संपर्क यंत्रणा पुन्हा एकदा बंद पडली आहे. तर, इंधनच नसल्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाइन निर्वासितांसाठी उभारलेल्या यूएनआरडब्लूए या संस्थेचा गाझामध्ये मदत पुरवण्यासाठी असलेल्या वाहतूकदारांशी संपर्क होत नसल्याने त्यांनीही आवश्यक वस्तूंचा पुरवठा थांबवला आहे. इस्रायलने गाझामध्ये इंधन पुरवठा करण्यास नकार दिला आहे. इस्रायलने पाठवलेल्या इंधनाचा वापर हमास त्यांच्या लष्करी कारवायांसाठी करतील, अशी भीती इस्रायलने व्यक्त केली आहे.
इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ११ हजार जण मारले गेल्याचा दावा हमासच्या आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात आला आहे.