29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषउत्तरकाशी बोगद्यातील कामगारांच्या बचावासाठी दिल्लीहून आले 'ऑगर ड्रिलिंग मशीन'!

उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांच्या बचावासाठी दिल्लीहून आले ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’!

५ मीटर प्रति तास वेगाने ढिगारा कापण्याची क्षमता

Google News Follow

Related

उत्तरकाशीतील सिल्कियारा-बरकोट बोगद्यात अडकलेल्या ४० कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य जोरदार सुरु आहे.बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा आजचा पाचवा दिवस आहे.बचाव कार्याला अधिक गती देण्यासाठी अत्याधुनिक कामगिरी असलेले ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’ आणण्यात आले आहे.भारतीय वायुसेनेच्या (IAF) C-१३०J विमानाने ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’ नवी दिल्लीहून बुधवारी उत्तरकाशी येथे आणण्यात आले आहे.तसेच केंद्रीय मंत्री व्हीके सिंह हे देखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उत्तरकाशीत पोहचले आहेत.

ऑगर ड्रिलिंग मशीन’चा वेग ५ मीटर प्रति तास इतका आहे.याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ढिगाऱ्यामध्ये दगडांचा देखील समावेश असल्याने वेळेचा अंदाज लावू शकत नाहीत.कामगारांना बोगद्यात अडकून ९६ तासांहून अधिक काळ लोटला आहे.सहकर्मचाऱ्यांच्या भीतीपोटी हे मशीन गुरुवारी सेवेत दाखल केले जाईल, असे अधिकारी म्हणाले.तसेच बुधवारी इतर कामगारांनी बोगद्याच्या ठिकाणी आंदोलन केले आणि आरोप केले की, अधिकारी आणि बचाव पथके अडकलेल्यांना वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाहीत.

एनएचआयडीसीएलचे संचालक अंशू मनीष खाल्को यांनी सांगितले की, ढिगाऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.तथापि, ते म्हणाले की,अत्याधुनिक कामगिरी असलेले ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’ मागवण्यात आले आहे, त्यामुळे चांगले परिणाम मिळण्याची आशा आहे.“आम्हाला ५०-६० मीटर ढिगाऱ्यातून ड्रिल करायचे असल्यास, ते सुमारे १२ तासांत पूर्ण होणे अपेक्षित आहे,” ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

शेहला रशीद म्हणते, काश्मीर म्हणजे गाझा नाही, श्रेय मोदी, शहांचे!

ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!

उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसकट सर्व सोंगाडे

सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात

बचाव कार्याचे अपडेट देताना उत्तरकाशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO) देवेंद्र पटवाल म्हणाले की, “दिल्लीहून आणलेल्या उच्च कार्यक्षमता औगर ड्रिलिंग मशीनला सामावून घेण्यासाठी एक व्यासपीठ आधीच तयार करण्यात आले आहे. ते लवकरच कामाला सुरुवात करेल.”

नाव न सांगण्याच्या अटीवर बचाव कार्यातील एका अधिकाऱ्याने बुधवारी हिंदुस्थान टाइम्सला सांगितले की, यापूर्वी पाठवण्यात आलेले मशीन हे दिल्लीतील एका कंपनीचे आहे.मात्र, हे मशीन चांगल्या स्थितीतही न्हवते आणि उच्च दर्जाचेही नव्हते.मंगळवारी बोगद्यातील ढिगारा उपसण्याचे काम सुरु असताना मार्गात दगड आल्याने हे मशीन कुचकामी ठरले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री व्हीके सिंह हे देखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.मंत्री व्हीके सिंह म्हणाले, “आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.लवकरच कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळेल.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा