तत्वज्ञान, अध्यात्म, जीवनविज्ञान, मानसशास्त्र, ध्यानसाधना अशा विविधांगी विषयांवर जनसामान्यांचे प्रबोधन करणारे जैन धर्मगुरू डॉ. मुनी अभिजित आणि मुनी जागृत हे कारूळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांच्या जन्मदिनी आशीर्वाद देणार आहेत.
प्रशांत कारुळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नंदनवन येथून १३ किमीचा पायी प्रवास करून हे तपस्वी शुभाशीर्वाद देण्यासाठी कारुळकर प्रतिष्ठानमध्ये येत्या १८ नोव्हेंबरला येत आहेत. डॉ. मुनी अभिजित आणि मुनी जागृत यांच्या आगमनामुळे आपल्याला खूप आनंद झाला असून जन्मदिवशी या गुरुवर्यांचे आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत कारूळकर यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
दिवाळीत मुंबई विमानतळावर ये- जा करणाऱ्या विमानांची संख्या १ हजार पार!
‘भारत हा जगभरातील सर्वोत्कृष्ट संघ; अंतिम सामन्यात त्यांची घोडदौड रोखणे कठीण’
‘निज्जरच्या हत्येत सहभागाचे आरोप करण्यापूर्वी पुरावे द्या’!
डॉ. मुनी अभिजित हे आचार्य महाश्रमण यांचे शिष्य आहेत. जैन धर्मातील देवतांचा सिद्धांत : एक अभ्यास या विषयावर इंग्रजीत पीएचडी केली आहे. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची भगवती सूत्राच्या माध्यमातून सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे.एका दिवसात त्यांनी संस्कृत भाषेत १०० श्लोकांची निर्मिती केली आहे. जैन धर्माच्या प्रचारार्थ जवळपास १० हजार किलोमीटर त्यांनी पायी वाटचाल केली आहे. धर्म, अध्यात्म याविषयी जागरुकता आणण्यासाठी त्यांनी नुकतीच उत्थान यात्राही पूर्ण केली.
मुनी जागृत हेदेखील आचार्य महाश्रमण यांचे शिष्य आहेत. अनेक सभांमध्ये त्यांनी अवधान विद्येचा प्रचार केला आहे. विज्ञान आणि जैन धर्म यांचा परस्परसंबंध स्पष्ट करण्यासाठीही त्यांनी प्रबोधन केले आहे. उत्थान यात्रेत त्यांनीही सहभाग घेतला होता.