जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी नेत्या शेहला रशीद म्हणाल्या, काश्मीर हा गाझा नाही, ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.कारण काश्मीर फक्त दहशतवाद,घुसखोरी आणि बंडखोरी अशामध्ये गुंतलेले होता. काश्मीरमध्ये आता बदल होत आहे.काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीचे श्रेय मी सध्याच्या केंद्र सरकारला, विशेषतः पंतप्रधानांना आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना देऊ इच्छिते, अशा शब्दात शेहला रशीद यांनी कौतुक केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी त्या बोलत होत्या.
यापूर्वी शेहला रशीद यांनी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांबाबत सहानभूती दर्शविली होती.हाच प्रश एएनआयने रशीद यांना विचारला.तेव्हा त्या म्हणाल्या, हो हे सत्य आहे.पण माझे हे मत २०१० पूर्वीचे होते. पण आज काश्मीरमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळत आहे, त्याबाबत मोदी सरकारचे आभार मानायला हवेत.
हे ही वाचा:
ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!
उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसकट सर्व सोंगाडे
सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर वीजचोरीचा आरोप
काशीरमध्ये गाझासारखी परिस्थिती नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे.यापूर्वी काश्मीर फक्त आंदोलने,निषेध मोर्चे,घुसखोरी, आणि बंडखोरी अशा घटनांसाठी ओळखला जायचा. मात्र, आता काश्मीरमधील स्थिती बदलली आहे.या बदललेल्या परिस्थितीचे श्रेय मी सध्याच्या केंद्र सरकारला, विशेषतः पंतप्रधानांना आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा याना देईन, त्या पुढे म्हणाल्या.
दरम्यान, शेहला रशीद यांनी या अगोदर केंद्र सरकारवर अनेक टीका केल्या होत्या.तसेच भारतीय सैन्यावर देखील गंभीर आरोप केले होते.मात्र, या नंतर आता केंद्र सरकारचे विशेषतः पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे.