पाकिस्तानमध्ये बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३५ वाजता भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये आलेला हा भूकंप ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे.
अहवालानुसार, या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. यापूर्वी, गेल्या शनिवारी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता पाकिस्तानमध्ये ४.१ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. त्यानंतर चार दिवसांतच हा दुसरा भूकंपाचा धक्का पाकिस्तानमध्ये बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून १८ किलोमीटर खाली होता.
यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये भूकंपांचे सत्र सुरू होते. ऑक्टोबर महिन्यात अफगाणिस्तानला भूकंपांच्या धक्क्यांनी हादरवून सोडले होते. यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला नेपाळमध्ये भूकंप झाला होता. त्याआधीही भूकंपाच्या दोन धक्क्यांनी नेपाळ हादरले होते.
हे ही वाचा:
सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात
टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!
कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!
मायकल जॅक्सनच्या ४० वर्षापूर्वीच्या जॅकेटची किंमत २.५ कोटी!
पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतात. भूगर्भशास्त्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पृथ्वी १२ टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्सची टक्कर झाल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात.