मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असून सरकार त्यावर तोडगा काढत असताना दुसरीकडे आरक्षणासाठी अनेक मराठा आंदोलक टोकाचं पाऊल उचलत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी होत असलेल्या आत्महत्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. आरक्षणासाठी आणखी एका तरुणानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. नांदेडमधील एका २५ वर्षीय तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विष प्रशान करून आत्महत्या केली आहे.
नांदेडमधील मरळक येथली दाजीबा रामदास शिंदे (वय २५ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. ११ नोव्हेंबरला त्याने विष प्रशान केल्यानंतर त्याला नांदेडमधील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्याच्याकडे सुसाईड नोट सापडली होती. सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले होते की, समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून दाजीबाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
दाजीबा हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून आरक्षण नसल्यामुळे तो काही करू शकला नाही, तसेच त्याच्या वडिलांनी त्यांची दीड एकर शेती विकली होती, असं मृत दाजीबाच्या भावानं सांगितलं, शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करू, असं तहसीलदार विजय आवधान यांनी सांगितलं.
हे ही वाचा..
दागिन्यांच्या जाहिरातींसाठी नवीन सेलिब्रिटी मिळवण्यात कंपन्यांच्या नाकी नऊ!
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट
उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!
भारतात पाचपैकी चार अवयवदात्या महिला!
दुसरीकडे मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. एकूण सहा टप्प्यात हा दौरा असणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे.