हैदराबादमधील एका निवासी इमारतीला भीषण आग लागली आहे.या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.
हैदराबादमधील नामपल्ली येथे रविवारी एका निवासी इमारतीला आग लागली.रसायने ठेवलेल्या तळमजल्यावर आग लागली आणि नंतर इतर मजल्यांवर पसरली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग कारच्या दुरुस्तीदरम्यान स्पार्कमुळे लागली होती.एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, केमिकलमुळे ही आग लागली.आगीला आटोक्यात आणण्यासाठी सर्वानी पाण्याचा मारा केला परंतु आग विझली नाही.
हे ही वाचा..
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट
उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!
संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!
आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!
या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत.सकाळी ९.३५ च्या सुमारास अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.आग कशामुळे लागली तसेच या आगीत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समजू शकलेले नाही.