इस्रायल आणि हमास यांच्यात गेले ३७ दिवस युद्ध सुरू असतानाच संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधात एक प्रस्ताव मांडण्यात आला. भारताने या प्रस्तावाच्या बाजूने म्हणजेच इस्रायलविरोधात मत दिले. पॅलिस्टिनींच्या परिसरात इस्रायली नागरिकांची वस्ती उभारण्याविरोधात संयुक्त राष्ट्राने हा प्रस्ताव मांडला होता. भारताने या प्रस्तावाच्या बाजूने मत दिले.
जेव्हापासून इस्रायल आणि हमासदरम्यान युद्ध सुरू झाले आहे, तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांत सादर झालेल्या प्रस्तावांपासून भारताने दूरच राहणे पसंत केले होते. भारताने हमासच्या दहशतवादावर यापूर्वी अनेकदा टीका केली आहे. तसेच, गाझा पट्टीमध्ये मानवतावादी मदत पोहोचली पाहिजे, असे मतही वारंवार मांडले आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांत भारताने इस्रायलविरोधात मत दिले. या मतदानात एकूण १४५ देशांनी सहभाग घेतला. १८ देश मतदानाला गैरहजर होते. तर, अमेरिका, इस्रायल, हंगेरी, कॅनडा, मार्शल द्वीप, मायक्रोनेशिया यांनी प्रस्तावाच्या विरोधात मत दिले. बहुमतांनी हा प्रस्ताव मान्य झाला. केवळ सात देशांनीच या प्रस्ताविरोधात मत दिले.
हेही वाचा..
उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!
उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!
आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!
मोबाईल खाली पडला असे सांगत सी लिंकवरून मारली उडी!
याआधी जॉर्डनने इस्रायलविरोधात संयुक्त राष्ट्रांत प्रस्ताव सादर केला होता. मात्र भारताने या मतदानापासून लांबच राहणे पसंत केले होते. या प्रस्तावात हमास ही कोणतीही दहशतवादी संघटना नाही. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून इस्रायलने हे हल्ले रोखले पाहिजेत, असे नमूद करण्यात आले होते. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ १२० देशांनी मत दिले होते. तर, १४ देशांनी या विरोधात मत दिले होते. तर, भारतसह ४५ देशांनी मतदानच केले नाही.