बुलढाण्यातील अपघातात एका मृत पावलेल्या एका भिक्षुकाकडे लाखो रुपये सापडल्याने खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात डोणगाव रोडवर सायकलस्वार भिक्षुकाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात भिक्षुक गंभीरित्या जखमी झाला होता. त्याला मेहकर येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले. तिथे उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे मोठी रक्कम सापडली असून एका भिक्षुकाकडे इतके पैसे पाहून पोलीस चक्रावून गेले आहेत.
बुलढाण्यातील मेहकर येथील शासकीय रुग्णालयाजवळ एक इसम मोटार सायकलच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता. पोलिसांना ही माहिती मिळताच या इसमाला पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी या इसमासोबत एक पिशवी होती. या पिशवीत या इसमाचे आधार कार्ड सापडले आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेला हा इसम कोण आहे? याचा तपास घेण्यासाठी या आधारकार्डचा उपयोग झाला असून त्या मदतीने पोलिसांना त्याच्या नातेवाईकांपर्यंत पोहचणे शक्य झाले.
या भिक्षुकाचे नाव दीपक बाबुराव मोरे (वय ४८ वर्षे) असून अंजनी मेहकर येथे राहत असल्याचे समोर आले. त्या भिक्षुकाकडे सापडलेल्या पिशवीत काही कागदपत्रे, चेकबुक आणि १ लाख ६३ हजार रुपये नगद रक्कम सापडली आहे. पोलिसांनी या इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेऊन ही रक्कम आणि कागदपत्रे नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहेत.
हे ही वाचा:
ललित पाटीलची प्रकृती पुन्हा बिघडली
यवतमाळ जिल्ह्यात सीतामंदिराचा जीर्णोद्धार
श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व आयसीसीकडून रद्द
हमासचा युनिट कमांडर ठार; हजारो नागरिकांनी उत्तर गाझा सोडले
भिक्षुकाजवळ सापडेलल्या पिशवीत एवढी रक्कम पाहून पोलीस चक्रावून गेले आहेत. भिक्षुजवळ तब्बल १ लाख ६३ हजार रुपये पोलिसांना सापडले याशिवाय चिल्लर, विविध बँकेची पासबुक, एटीएम कार्ड आणि पॅन कार्ड देखील आढळून आले आहे. एवढे पैसे भिक्षुकाकडे कसे आले? याचा तपास पोलीस करत आहेत.