ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी भारताने पुन्हा एकदा लसीकरणाचा विश्वविक्रम केला आहे. ३१ ऑगस्ट भारताने एकाच दिवशी १ कोटी ३३ लाख पेक्षा अधिक लसींचे डोस दिले आहेत. यासोबतच भारतातील एकूण लसीकरण ६५ कोटीच्या पुढे गेले आहे. ऑगस्ट महिन्यात दुसऱ्यांदा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक लसींचे डोस दिले गेले आहेत.
कोविडच्या जागतीक महामारीच्या विरोधात लसीकरण हे एकमेव अस्त्र आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत भारत नव नवे विक्रम नोंदवताना दिसत आहे. भारताने एका दिवसात एक करोड पेक्षा जास्त नागरिकांना लसीचे डोस देण्याचा विक्रम पुन्हा एकदा करून दाखवला आहे आणि या वेळी आपलाच जुना विश्वविक्रम मोडत नवा विश्वविक्रम रचला आहे.
हे ही वाचा:
लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा
अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल
ठाकरे सरकारचे आदेश झुगारून मनसेने फोडली हंडी
लसीकरणात भारत केवळ उत्कृष्ट कामगिरी करत नसून वेळेच्या आधीच आपले लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल देखील करत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत भारताने ६० कोटी लसी देण्याचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य अनेकांना स्वप्नवत वाटले होते. काही परदेशी माध्यमांनी तर भारताची खिल्लीही उडवली होती. पण महिना अखेरीस भारतात एकूण ६५ कोटी पेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारताच्या या कामगिरीमुळे अनेकांची बोटे तोंडात गेली आहेत.







